आयुर्वेद म्हटलं की बऱ्याच जणांना वाटते की त्यामध्ये मांसाहार निषिद्ध सांगितला आहे, पण खरे तर आयुर्वेद हे जगण्याचे एक शास्त्र आहे आणि त्यात कुठेही मांसाहार करू नये असा उल्लेख नाही, उलट अगदी हिंस्त्र श्वापदांपासून सध्या पाळीव प्राण्यांपर्यंत सगळ्यांच्या मांसाच्या गुणांचे वर्णन केले गेले आहे.हा विषय लिहिण्याचे कारण हे की बऱ्याच लोकांकडून हा प्रश्न विचारण्यात येतो की “आयुर्वेदात मांसाहार वर्ज्य आहे ना?”.तर अजिबात नाही.सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आयुर्वेद हे अध्यात्म नाही, योग ही नाही, ते एक वैद्यकीय शास्त्र आहे.त्यामध्ये मोक्ष, योग, सदवृत्त ह्यांचे वर्णन आहे, परंतु सर्वसामान्य लोकांच्या आहाराबद्दलच्या वर्णनात मांसाहाराचे सविस्तर वर्णन आले आहे.हा रोजच्या आहारात, ठराविक व्याधींमध्ये, ठराविक औषधांमध्ये वापरला जातो. क्षयरोग, वजनवाढ, डोळ्यांची शक्ती कमी होण्याची आजार ह्यामध्येही मांसाचे वर्णन आले आहे.कोंबडी, तितर सारख्या पक्षांपासून मासे, वाघ, सिंह,जंगलातले महापशु ह्या सर्वांच्या मांसाच्या गुणांचे वर्णन आले आहे. उदाहरणार्थ मासे हे कफकारक सांगितले आहेत, कोंबड्यांचे मांस हे शुक्रकर, बकऱ्याचे मांस हे माणसाच्या धातूंच्या समान असल्याने पौष्टिक आणि पचायला हलके, सशाचे मांस हे भूक वाढवणारे आणि मलबद्धता करणारे इत्यादी (अष्टांग हृदय सू.6/56). मांसरस(सूप), वेसवार(खिमा), शूल्यमांस(कबाब/bbq) अशा अनेक पाककृतीही सांगितल्या आहेत. रोज मांसाहार करणाऱ्यांचे शारीरिक श्रम पण त्याच स्वरूपाचे पाहजेत जे बरेचजण सोयीस्कर रित्या विसरतात. ह्याबरोबरच ही गोष्टही लक्षात घ्यायला पाहिजे की कशा पद्धतीचे मांस असावे हा पण निर्देश केला गेला आहे. मांस हे ताजे पाहिजे. विषाने मृत्यू, व्याधीने किंवा आपोआप मेलेल्या प्राण्यांचे मांस घेऊ नये.खूप चरबी असलेले मांस(आत्ताच्या भाषेत red meat) शरीराला अहितकर असते. तरुण प्राण्यांचे, आतडी काढून टाकले गेलेले असे मांस असावे. हे वाचून तुम्हालाही लक्षात आले असेल की आता असे मांस मिळणे महामुश्किल झाले आहे.आता काय कुणी शिकार करून मांस आणत नाही.सध्याचा नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या बघता नुसतं नैसर्गिक घरात राहणारे प्राणी वापरून पुरणार नाही.त्यांना मुद्दाम वेगळ्या ठिकाणी वाढवावेच लागते.आता इतक्या लोकांना पुरवायचे म्हटल्यावर भरपूर मांस पाहिजे, त्यासाठी हार्मोन्स ची injections टोचली जातात जे आपल्या शरीरात जातात.

*उत्सुक लोकांनी food.inc ही documentary जरूर बघावी.
https://youtu.be/C4osE1BjdPw

सर्वसाधारणपणे ह्यात असा प्रश्न उत्पन्न होतो की झाडांना पण फवारणी केली जातेय की. एकदम बरोबर आहे, पण मांस हे मांसाच्या जवळचे असल्याने त्यात जे घटक उत्पन्न होतात ते लगेचच आपल्या शरीरात शोषले जातात.भाज्यांमधल्या लोहापेक्षा प्राण्यांमधले लोह हे लवकर शोषले जाणारे असते हे तर ज्ञातच आहे. कोंबड्यानं वाईट पद्धतीने पाळले जाते, त्या दाणे टिपण्यापेक्षा त्यांना रोज आयते खायला दिले जाते.गावरान कोंबडी आणि मुद्दाम संप्रेरके टोचून बनवलेली कोंबडी ह्यामध्येही भरपूर फरक दिसतो. (गूगल वर बघावे) त्या चवीला चांगल्या असल्या तरी पचायला जड होतात. कोंबड्याना किंवा शेळ्यांना ज्या पद्धतीने मारले जाते, वाईट पद्धतीने हाताळले जाते, किंवा त्यांचे खूप हाल होतात तेव्हा त्यांच्या शरीरात भीतीमुळे fight or flight response मुळे adrenaline नावाचे संप्रेरक त्यांच्या शरीरात तयार होते त्यामुळे ते मांस लवकर खराब होते, त्यामध्ये आम्लधर्मी गुण वाढतात आणि ते मानवी शरीरात stress, स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि थकवा निर्माण करतात.

फ्री रेंज (निसर्गात वाढलेले) आणि नॉन GMo (Genetically modified) असे प्राणी खायला हरकत नाही जे मिळणे अवघड आहे. कसाईखान्यांसाठी नियम बनत आहेत पण ते पाळले जातातच असे नाही. फ्रोझन, प्रक्रिया केलेले (processed meat) किंवा साठवलेले मांस पण वाईटच.Ham, bacon, salami हे ग्रेड 1 carcinogenic (कर्करोग करणारे) आहेत.
प्रत्यक्ष जंगलात जाऊन शिकार करून आणलेले किंवा घरामध्ये पाळल्या गेलेल्या त्यांच्या नैसर्गिक घरातले प्राणी खाणे उत्तम जे आजकालच्या जगात जवळ जवळ अशक्यच आहे. त्यामुळे कितीही प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सने उत्तम असले तरी ह्या बाकी गोष्टींकडे कानाडोळा करून चालणार नाही.मनुष्यप्राणी काय खातो ह्यावर त्याचा अन्नमय कोष बनत असतो त्यामुळे त्याचा स्वभाव, आचार, विचार हे बनत असतात.ह्याबरोबरच जी रसायने जातात त्यांचे अजून काय काय दूरगामी परिणाम होत असतात हे सात पिढ्यांनंतरच अजून नीट कळेल.त्यामुळे हे मांस किंवा भाज्या चांगल्या ठिकाणी उगवलेल्या, कमीतकमी रासायनिक प्रक्रिया केलेल्या खाव्या हे उत्तम. ज्या लोकांना वर सांगितलेल्या गुणांचे, प्रकारचे मांस मिळते त्यांनी ते अवश्य खावे, भारतीय वैद्यकशास्त्र त्याच्या विरोधात नाही, परंतु बाकीच्यांनी मात्र सध्यातरी मांसाचे प्रमाण आहारात अगदी कमीतकमी ठेवावे किंवा पूर्ण टाळावे.
(वरील लेखातील आधुनिक माहिती खालील लिंक्स च्या संदर्भाने घेतली आहे:
*https://www.quora.com/Is-the-adrenaline-in-…/…/Dean-Curling…
*https://www.google.com/…/articles/why-scared-animals-taste-…
*https://www.who.int/features/qa/cancer-red-meat/en)